पुणे – वक्फ बोर्ड भूमी अपव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुण्यात ११ नोव्हेंबर या दिवशी एकूण ७ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पुण्यात नेमक्या कोणत्या ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘वक्फ बोर्ड’ हे अल्पसंख्यांक मंत्रालयांतर्गत येत असून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडे हे मंत्रालय आहे.
अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत हा प्रकार ‘वक्फ बोर्डा’च्या कार्यालयात घडला नाही, असे सांगितले. अन्य काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याचे त्यांनी मान्य केले आहे.