वासुदेवनगर, डिचोली येथे पिस्तुलातून सुटलेल्या गोळीमुळे बालकाचा गेला बळी

खेळता-खेळता सर्व्हिस पिस्तुलातून अचानक सुटलेली गोळी तोंडात घुसल्याने मिहीर वायंगणकर या ४ वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला.

अब्दुल लतीफ कोकणी आणि त्याचे गुंड यांच्याकडून न्यायाधिशांसह अधिवक्ता, कर्मचारी आणि पक्षकार यांना अरेरावी !

येथील अब्दुल लतीफ कोकणी आणि त्याचे कुटुंबीय यांचे अनेक दावे आणि फौजदारी खटले येथील विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. त्या त्या न्यायालयांत प्रत्येक दिनांकाला अब्दुल कोकणी आणि त्याचे गुंड सहकारी न्यायालयांतील न्यायाधीश, अधिवक्ता, कर्मचारी आणि पक्षकार यांच्याशी वागतांना अरेरावीची भाषा वापरतात.

नगर येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगारातील चालकाची बसच्या शिडीला गळफास लावून आत्महत्या

हा प्रकार २९ ऑक्टोबर या दिवशी उघडकीस आला. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपात ते सहभागी झाले होते.

वेंगुर्ले शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ वर पडलेले झाड अखेर ५ मासांनंतर हटवले

शाळेवर पडलेले झाड वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या मालकीचे असल्याने ते ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने तोडायचे कि पंचायत समिती प्रशासनाने ? असा प्रश्‍न निर्माण झाला होता; मात्र उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर यांच्या पुढाकाराने तो प्रश्न निकाली निघाला.

कोकण रेल्वेमार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्ववत् करा अन्यथा ‘रेल्वे बंद’ आंदोलन करणार ! – राष्ट्रीय काँग्रेसची चेतावणी  

कोरोनाच्या कालावधीत कोकण रेल्वेमार्गावर काही विशेष गाड्या चालू करण्यात आल्या. या गाड्यांच्या तिकिटांचे दर नियमितच्या गाड्यांच्या तिकिटांपेक्षा अधिक आहे. आता कोरोनाचा संसर्ग उणावला असल्याने ‘विशेष रेल्वे’च्या नावाखाली चालू असलेली प्रवाशांची लूट थांबवून नियमितच्या गाड्या चालू कराव्यात अन्यथा…

बांगलादेशातील हिंदूंविषयी राहुल गांधी गप्प का ?

‘त्रिपुरामध्ये आमच्या मुसलमान बांधवांशी अमानुष व्यवहार केला जात आहे’, असे ट्वीट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्रिपुरामधील हिंसाचाराच्या प्रकरणी केले आहे.

समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून घेतले जाणारे वरवरचे निर्णय टाळण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता !

शासन, प्रशासन आणि जनता यांच्यात नैतिकता, कर्तव्यनिष्ठा यांचा अभाव असण्याचे कारण म्हणजे त्यांना धर्मशिक्षण दिलेले नाही.

बांगलादेशी घुसखोरी : भारतीय सुरक्षेसाठी धोकादायक !

बांगलादेशी घुसखोरी थांबवण्याच्या राष्ट्रकार्यात सामान्य नागरिकांनी योगदान द्यावे !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग : दीपावलीपूर्वी घराची स्वच्छता आणि सजावट करणे यांमागील धर्मशास्त्रीय आधार !
भावसत्संग : प्रभु श्रीरामाची कृपा संपादन केलेले संत !
धर्मसंवाद : दीपावली विशेष : फटाके उडवणे अयोग्य का ? (भाग २)