‘हलाल प्रमाणपत्र’ देणार्‍या सर्व आस्थापनांवर हिंदु बांधवांनी बहिष्कार घालायला हवा ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद

‘या वर्षी साजरी करा : हलालमुक्त दिवाळी !’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

Read more‘हलाल प्रमाणपत्र’ देणार्‍या सर्व आस्थापनांवर हिंदु बांधवांनी बहिष्कार घालायला हवा ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद

मंदिरापासून ११४ मीटर अंतरावर असलेला बिअर बार हटवण्याचा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

हिंदु राष्ट्रात मद्यावर बंदी असेल, त्यामुळे असे प्रश्‍नच निर्माण होणार नाही !

हलालमुक्त दिवाळी साजरी करा ! – श्री. प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

२९ ऑक्टोबर या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वाराणसी येथील काशी विश्‍वनाथ संकुलाचे (कॉरिडॉरचे) ८० टक्के काम पूर्ण

श्री काशी विश्‍वनाथ मंदिराचे मुख्य कार्यपालक अधिकारी डॉ. सुनील वर्मा म्हणाले की, या मार्गाचे स्वरूप आकारास आले आहे. या मार्गावरील सुशोभीकरणाचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल.

पंतप्रधान मोदी यांनी व्हॅटिकनमध्ये घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट !

‘पोप फ्रान्सिस यांच्याशी अतिशय प्रेमळ भेट झाली. मला त्यांच्याशी अनेक सूत्रांवर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले’, असे पंतप्रधान मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भेटीनंतर सांगितले.

काश्मीरचा उल्लेख ‘भारताने कह्यात घेतलेले काश्मीर’ असे केल्याने जे.एन्.यू.मधील वेबिनार प्रशासनाकडून रहित !

वेबिनार रहित करणे, ही वरवरची उपाययोजना झाली. असे कृत्य करणार्‍यांना कारागृहात डांबणे आवश्यक !

भारत सरकारने बांगलादेशला समज द्यावी ! – रा.स्व. संघाच्या बैठकीत ठराव

‘बांगलादेशात अल्पसंख्य समाजावर अत्याचार होत असतांना संयुक्त राष्ट्रांसारखी आंतरराष्ट्रीय संस्था, तसेच मानवी हक्क संघटना कशा गप्प बसू शकतात ?’ असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित करण्यात आला.

हिंदु देवतांच्या संदर्भातील आक्षेपार्ह साहित्य हटवा ! – देहली उच्च न्यायालयाचा ट्विटरला आदेश

मुळात हे सरकारने केले पाहिजे आणि अशा सामाजिक माध्यमांसाठी कठोर कायदा केला पाहिजे, जेणेकरून हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्याचा कुणीही धाडस करणार नाही !

‘मॅकडोनल्ड्स’, ‘बर्गर किंग’, ‘डॉमिनोज्’, ‘पिझ्झा हट’ आदी आस्थापनांच्या खाद्यपदार्थांमध्ये केला जातो आरोग्याला घातक रसायनांचा वापर ! – अमेरिकेतील संशोधकांचा निष्कर्ष

फास्ट फूडमध्ये वापरली जाणारी रसायने एरव्ही प्लास्टिक नरम ठेवण्यासाठी वापरली जातात. असे खाद्यपदार्थ खाल्ल्यावर त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.

पाकच्या कोटरी शहरात देवी मातेच्या मंदिरात चोरी !

चांदीचे १० तोळ्यांचे ३ हार आणि २५ सहस्र रुपयांची चोरी
पाकमध्ये असुरक्षित असलेले हिंदू आणि त्यांची मंदिरे !