नगर – येथील शेवगाव राज्य परिवहन मंडळाच्या आगारातील दिलीप काकडे या चालकाने येथील आगारात उभ्या असलेल्या बसच्या शिडीला गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार २९ ऑक्टोबर या दिवशी उघडकीस आला. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपात ते सहभागी झाले होते. आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. आतापर्यंत १९ मासांमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या २६ कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील बहुतांश आत्महत्या या आर्थिक विवंचनेतून झालेल्या आहेत.