हिंदु वसुंधरा !

जो हिंदु धर्म मोठ्या दुष्प्रवृत्तींना नष्ट करता आला नाही, तो सध्याच्या विरोधकांकडून कधी नष्ट होईल का ? तरीही धर्मकर्तव्य म्हणून हिंदूंनी संघटित व्हावे आणि हिंदु धर्माचा जोमाने जगभर प्रसार करावा !

लातूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद !

निवडणुकीसाठी ७० उमेदवार मैदानात असून भाजपच्या वतीने प्रविष्ट करण्यात आलेले सर्व अर्ज निवडणूक अधिकार्‍यांनी बाद ठरवले आहेत.

पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी झोपडपट्टीचे पाडकाम रोखले !

२२ ऑक्टोबर या दिवशी नवीन पनवेल येथील भीमनगर झोपडपट्टी पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात आलेल्या सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाला भाजपचे उत्तर रायगडचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोखून नागरिकांसह ‘ठिय्या आंदोलन’ केले.

बांगलादेशात मंदिरे आणि हिंदू यांवर सशस्त्र आक्रमणे करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’, अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर, इस्कॉन मंदिरावर, तसेच शेकडो हिंदूंवर आक्रमण करण्यात आले.

तिलारी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी येत नसल्याने शेती आणि बागायती यांची हानी

तिलारी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही उजव्या कालव्यात पाणी आलेले नाही. त्यामुळे घोटगेवाडी, परमे येथील शेतकर्‍यांच्या केळीच्या बागा पाण्याच्या अभावी करपून जात आहेत.

दाभोळे येथील श्री गणपति मंदिरातील अर्पणपेट्या फोडल्या

दाभोळे, पोखरबाव येथील श्री गणपति मंदिरातील अर्पणपेट्या फोडून अज्ञात चोराने अंदाजे ४ सहस्र ८०० रुपये चोरल्याची तक्रार मंदिराचे पुजारी श्री. विठ्ठल बाळकृष्ण राऊत यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली आहे.

उरुळी कांचन (जिल्हा पुणे) येथे भरदिवसा केलेल्या गोळीबारात दोघे ठार, तर दोघे घायाळ !

उरुळी कांचन येथील सोलापूर-पुणे महामार्गावरील हॉटेल सोनईसमोर २२ ऑक्टोबर या दिवशी भरदुपारी सोनवणे यांच्या टोळीतील ४ – ५ जणांनी वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर आक्रमण करून गोळीबार केला. त्यात जगताप हे ठार झाले असून त्यांचे २ सुरक्षारक्षक गंभीररित्या घायाळ झाले….

देवली आणि आंबेरी येथे वाळूच्या अवैध उपशाच्या विरोधात महसूल विभागाकडून १३ ‘रॅम्प’उद्ध्वस्त

देवली आणि आंबेरी येथे कर्ली नदीच्या पात्रात अवैधरित्या चालू असलेल्या वाळू उपशाच्या ठिकाणी महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकली. या वेळी पथकाने येथे उभारण्यात आलेले १३ ‘रॅम्प’ उद्ध्वस्त केले.

शेतकर्‍यांचे हितचिंतक पंजाबराव डख !

शेतकर्‍यांच्या पिकांची हानी टाळण्यासाठी कुणाकडून कसलेही मानधन न घेता अवघ्या काही मिनिटांत ३ कोटी लोकांपर्यंत शेती आणि हवामान यांचे अनुमान पोचवणारे श्री. पंजाबराव डख हे शेतकर्‍यांचे हितचिंतक बनले आहेत.

ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणार्‍या शॅकधारकांची अनुज्ञप्ती रहित होऊ शकते ! – जिल्हाधिकारी

ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचा मासिक अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर करावा.  यामध्ये कायद्याचे उल्लंघन करणार्‍या संबंधित शॅकमालकाचे नाव आणि पत्ता असावा, असेही ते म्हणाले.