हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आणि नवापूर येथील प्रशासनाला निवेदन !

नंदुरबार, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’, अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर, इस्कॉन मंदिरावर, तसेच शेकडो हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. या घटनेचा निषेध करत ‘आक्रमण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, या मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने २१ ऑक्टोबर या दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आणि नवापूर येथील प्रशासनाला देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवापूर येथील तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना, तर हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने तळोदा येथील तहसीलदार राजेश वखारे यांना निवेदन देण्यात आले. नवापूर येथे निवेदन देतांना सर्वश्री मुकुंद राजपूत, विशाल पाटील, संदीप पाटील, देविदास गावित, कृष्णकांत पाटील, भवरसिंग पराजप्रोहित, तर तळोदा येथे निवेदन देतांना हिंदु राष्ट्र सेनेचे सर्वश्री अमन जोहरी (जिल्हाध्यक्ष), किरण ठाकरे (तालुका अध्यक्ष), पारस परदेशी, कार्तिक शिंदे, निखिल सोनार, हितेश तांबोळी, गौतम रातबोड, विजय पवार, जिग्नेश मराठे, हर्षल बोरसे, योगेश चौहान आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !