देवली आणि आंबेरी येथे वाळूच्या अवैध उपशाच्या विरोधात महसूल विभागाकडून १३ ‘रॅम्प’उद्ध्वस्त

रॅम्प उद्ध्वस्त करणे ही महसूल विभागाची वरवरची कारवाई आहे. नौका जप्त केल्या जात नाहीत. संबंधितांवर गुन्हे नोंद करून त्यांना कारागृहात टाकले जात नाही. या गोष्टींचे काय ?

प्रातिनिधिक छायाचित्र

मालवण – तालुक्यातील देवली आणि आंबेरी येथे कर्ली नदीच्या पात्रात अवैधरित्या चालू असलेल्या वाळू उपशाच्या ठिकाणी महसूल विभागाच्या पथकाने २४ ऑक्टोबरला धाड टाकली. या वेळी पथकाने येथे उभारण्यात आलेले १३ ‘रॅम्प’ उद्ध्वस्त केले.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या अवैधरित्या खाडी, तसेच नद्या यांच्या पात्रातून वाळूचा उपसा केला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच मसुरे गावातील डांगमोडे येथे महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करून १२ रॅम्प उद्ध्वस्त केले होते.
अवैधरित्या चालणार्‍या या वाळूच्या उपशाच्या विरोधात ग्रामस्थ आवाज उठवत असतात; परंतु प्रारंभी प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते; मात्र ग्रामस्थांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाला जाग येत अन् कारवाई केली जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

(रॅम्प म्हणजे नदीच्या पात्रातून वाळू बाहेर काढणे सोयीचे व्हावे; यासाठी केलेले बांधकाम)