राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ‘डिसमेंटलिंग कास्टिझम’च्या ऐवजी ‘डिसमेंटलिंग ऑफ हिंदुत्व’ या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार असल्याचा चुकीचा उल्लेख !

रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाकडून दिलेल्या चुकीच्या माहितीविषयी जिल्ह्यात केला जात आहे निषेध !

परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून समन्स !

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नेमलेल्या चौकशी आयोगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी उपस्थित रहाण्याविषयी समन्स (सूचना) दिले आहे.

केंद्रीय यंत्रणेने काम करतांना सर्वांना समान न्याय लावावा ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

गेल्या १५ वर्षांत अनुमाने ६५ साखर कारखाने विकले गेले किंवा ते इतरांना चालवायला दिले गेले; मात्र त्याविषयी कुणी काहीच बोलत नाही, असा आरोप करत ‘केंद्रीय यंत्रणेने काम करतांना सर्वांना समान न्याय लावावा’, अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

शेतकरी अद्यापही विनामूल्य डिजिटल सात-बार्‍याच्या प्रतीक्षेत !

सर्व सात-बारा उतारे प्रिंट काढून (छापून) सिद्ध आहेत; मात्र तलाठ्यांच्या संपामुळे त्यांचे वितरण करणे शक्य नाही. संप संपल्यानंतर प्रत्येक गावात विनामूल्य डिजिटल सात-बारा उतार्‍याचे वाटप केले जाईल, अशी माहिती हवेली तहसीलदारांनी दिली.

भारतात समान नागरी कायदा अस्तित्वात येईल !

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाची भाकणूक !

शिवशाहीचे वचन देणार्‍यांनी निजामशाही आणली आहे ! – चित्रा वाघ, नेत्या, भाजप

३ दिवसांपूर्वी पैठण तालुक्यातील बिडकीन गावाजवळील तोंडोंळी वस्तीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकून वस्तीतील २ महिलांवर सामूहिक बलात्कार केला होता. त्या अनुषंगाने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वस्तीला २१ ऑक्टोबर या दिवशी भेट देऊन सरकारवर टीका केली.

नंदुरबार जिल्हा परिषद ही भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे ! – सदाभाऊ खोत, सदस्य, पंचायत राज समिती आणि आमदार

केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून आलेल्या निधीचा काही ठिकाणी योग्य वापर झालेला नाही. पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आहे; मात्र प्रत्यक्षात त्या अपूर्ण आहेत.

चिनी बनावटीचे फटाके घाऊक विक्रेत्यांनी विकू नयेत ! – करवीर शिवसेनेचे फटाके विक्रेत्यांना निवेदन

भारतात फोफावलेल्या चिनी वस्तूंच्या व्यापारात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाकेही मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यामध्ये विषारी पदार्थांचे प्रमाण पुष्कळ असते.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय कार्यशाळेच्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती

‘आझादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत ‘भारतीय इतिहास संशोधन मंडळ, देहली’ यांच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाच्या आवश्यक गोष्टींमधून जातीयवादाचे धडे मिटवणे’, या विषयावर दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

श्री तुळजाभवानीदेवीचे बनावट संकेतस्थळ सिद्ध करून भाविकांची लूट !

श्री तुळजाभवानीदेवीचे बनावट संकेतस्थळ सिद्ध करून भक्तांना गंडा घातला जात असल्याची माहिती समोर आली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या भक्तांना फसवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.