उरुळी कांचन (जिल्हा पुणे) येथे भरदिवसा केलेल्या गोळीबारात दोघे ठार, तर दोघे घायाळ !

कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा !

वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर आक्रमण करून गोळीबार केला ते ठिकाण 

लोणी काळभोर (पुणे) – उरुळी कांचन येथील सोलापूर-पुणे महामार्गावरील हॉटेल सोनईसमोर २२ ऑक्टोबर या दिवशी भरदुपारी सोनवणे यांच्या टोळीतील ४ – ५ जणांनी वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर आक्रमण करून गोळीबार केला. त्यात जगताप हे ठार झाले असून त्यांचे २ सुरक्षारक्षक गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. घायाळ अवस्थेत जगताप यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात टोळीतील स्वागत खैरे हे जागीच ठार झाले आणि उर्वरित पळून गेले. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची माहिती पुढे येत आहे.

राहू येथे अवैध वाळू उपशावरून वर्ष २०११ मध्ये गणेश सोनवणे आणि त्यांचा चुलत भाऊ रमेश सोनवणे यांची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप संतोष जगताप यांच्यावर होता. या प्रकरणात जामिनावर संतोष बाहेर आले होते.