जनताभिमुख लोकप्रतिनिधी हवेत !

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. ‘हसन मुश्रीफ आणि त्यांचे जावई यांनी १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे’, असा आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या लेखी परीक्षेत बनावट (डमी) विद्यार्थी बसल्याचे उघडकीस !

कागदपत्र आणि छायाचित्र यांची पडताळणी केली असता तो बनावट असल्याचे लक्षात आले.

६ वर्षांच्या आरवची हत्या त्याचे वडील राकेश यांनी केल्याचे उघड !

शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील कु. आरव या ६ वर्षाच्या मुलाची हत्या कौटुंबिक वादातून त्याचे वडील राकेश केसरे यांनी केल्याचे पोलीस अन्वेषणात उघड झाले. शाहूवाडी पोलिसांनी राकेश यांना अटक केली आहे.

काश्मीरचा आतंकवाद संपवण्यासाठी पाकला नष्ट करा !

जिहादी आतंकवाद्यांकडून जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील एका शाळेत घुसून शिक्षिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली. दोन दिवसांपूर्वी आतंकवाद्यांनी श्रीनगरमध्ये दोघा हिंदूंची हत्या केली होती.

ब्राह्मणद्वेषी संघटनांचा पोटशूळ !

‘राजमाता जिजाऊ, समर्थ रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळांच्या माध्यमातून बालशिवाजींना डावपेच शिकवले आणि पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राष्ट्रनायक बनले’, या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमातील विधानामुळे ब्राह्मणद्वेषी व्यक्ती आणि संघटना यांना पोटशूळ उठला.

आपण भारतात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

‘जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण मात्र सध्या इतर देशांकडे पहातो.

‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारची खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देणारी व्यवस्था असतांना ‘हलाल’ या धार्मिक व्यवस्थेला अनुमती का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘हल्दीराम’ची ५०० उत्पादने, ‘अमूल’चे आईस्क्रीम, ‘आशीर्वाद’ आटा, ‘फॉर्च्युन ऑईल’, या खाद्यपदार्थांसह अनेक आयुर्वेदाची औषधे ही ‘हलाल सर्टिफाईड’ आहेत. भारताच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे (‘एफ्.डी.ए.’चे) ‘खाद्य सुरक्षा आणि मानकीकरण प्राधिकरण’ (एफ्.एस्.आय.ए.) हे अधिकृत शासकीय प्रमाणपत्र असतांना ‘हलाल सर्टिफिकेट’ कशासाठी ?

‘आपलेच खरे, उर्वरित सर्व खोटे’, असे न मानणारा एकमेव वैश्विक धर्म म्हणजे ‘हिंदु धर्म’ !

‘आपलेच खरे, आपला धर्मग्रंथ जे सांगतो तेच शाश्वत आणि अखेरचा शब्द’, असे श्रद्धापूर्वक मानणार्‍या असहिष्णु धर्मांना यापुढे भविष्य नाही. त्यांना देशकालपरिस्थितीनुरूप पालटावेच लागेल. हिंदूंचा एकच एक असा धर्मग्रंथ नाही. एकच एक देव नाही, देवाचा एकच एक असा प्रतिनिधी किंवा संदेशवाहक नाही.

रुग्णाईत स्थितीतही प्रत्येक श्वासासहित गुरुस्मरण करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) !

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी यांना ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकरकाकूंमध्ये रुग्णाईत असताना जाणवलेले पालट पुढे दिले आहे.