‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारची खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देणारी व्यवस्था असतांना ‘हलाल’ या धार्मिक व्यवस्थेला अनुमती का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

प्रतिकात्मक छायाचित्र

‘हल्दीराम’ची ५०० उत्पादने, ‘अमूल’चे आईस्क्रीम, ‘आशीर्वाद’ आटा, ‘फॉर्च्युन ऑईल’, या खाद्यपदार्थांसह अनेक आयुर्वेदाची औषधे ही ‘हलाल सर्टिफाईड’ आहेत. भारताच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे (‘एफ्.डी.ए.’चे) ‘खाद्य सुरक्षा आणि मानकीकरण प्राधिकरण’ (एफ्.एस्.आय.ए.) हे अधिकृत शासकीय प्रमाणपत्र असतांना ‘हलाल सर्टिफिकेट’ कशासाठी ? एकीकडे खाद्यपदार्थांशी संबंधित प्रमाणपत्र देणारी ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारची व्यवस्था असतांना हलाल प्रमाणपत्र देण्याची अनुमती खासगी इस्लामिक धार्मिक संस्थांना का देण्यात आली ?