कौटुंबिक वादातून पित्याने मुलाची हत्या करणे, हे समाजाची नीतीमत्ता रसातळाला गेल्याचे उदाहरण ! – संपादक

कोल्हापूर, ७ ऑक्टोबर – शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील कु. आरव या ६ वर्षाच्या मुलाची हत्या कौटुंबिक वादातून त्याचे वडील राकेश केसरे यांनी केल्याचे पोलीस अन्वेषणात उघड झाले. शाहूवाडी पोलिसांनी राकेश यांना अटक केली आहे. राकेश यांनी हत्या केल्यावर दिशाभूल करण्यासाठी आणि ही हत्या नरबळी आहे, असे भासवण्यासाठी मृतदेहावर हळद-कुंकू, गुलाल टाकला होता. ४ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळपासून आरव गायब झाला होता आणि ५ ऑक्टोबर या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला होता. (रागावर नियंत्रण कसे मिळवायचे ? , परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला सामोरे कसे जायचे ?, याचे कोणतेच शिक्षण सध्याची शिक्षणप्रणाली, तसेच समाजव्यवस्थेत मिळत नसल्याने किरकोळ कारणावरून हत्या, आत्महत्या असे प्रकार सर्रास घडत आहेत ! हे सर्व टाळण्यासाठी समाजाला मूल्यशिक्षण आणि धर्मशिक्षण अत्यावश्यक आहे ! – संपादक)
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !