मराठा आरक्षणासंबंधीचे विधेयक लोकसभेत सादर

नवी देहली – लोकसभेमध्ये ९ ऑगस्ट या दिवशी मराठा आरक्षणासंबंधी विधेयक मांडण्यात आले. विधेयकात ३३८ ब आणि ३४२ अ या अंतर्गत काही सुधारणा होणार आहेत. हे विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना काही अधिकार मिळणार आहेत. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रहीत केले आहे. यानंतर महाराष्ट्र सरकारने ‘मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा’, अशी मागणी केली होती.