कोलकाता येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीला २ तोळ्यांचा सोन्याचा ‘मास्क’ !

  • देवीच्या हातांमध्ये दाखवल्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणार्‍या वस्तू !

  • असे दाखवून कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत असल्याचा दावा !

  • हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा किती अभाव आहे, हेच या गोष्टीतून लक्षात येते ! हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींचे महत्त्व हिंदूंना ठाऊक नसल्याने ते बुद्धीच्या स्तरावर विचार करून त्यांचे अशा प्रकारे देवांचे मानवीकरण करून विडंबन करत आहेत ! – संपादक
  • कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी अन्य अनेक पर्याय उपलब्ध असतांना देवतांचा वापर कशासाठी ? धर्मप्रेमी हिंदूंनी याचा वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे ! – संपादक
  • ख्रिस्ती किंवा मुसलमान कधीही त्यांच्या श्रद्धास्थानांचा अशा प्रकारे वापर करत नाहीत, एवढे तरी हिंदूंनी त्यांच्याकडून शिकायला हवे ! – संपादक
तृणमूल काँग्रेसच्या आमदार आणि बंगाली गायक अदिती मुनशी सोन्याच्या मास्कबद्दल सांगताना

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

कोलकाता (बंगाल) – कोलकाता शहरामध्ये श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या तोंडाला २ तोळ्यांचा सोन्याचा ‘मास्क’ लावण्यात आला आहे. तसेच मूर्तीच्या हातांमध्ये निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्यासाठी लागणार्‍या वस्तू दाखवण्यात आल्या आहेत. मूर्तीच्या हातामध्ये मास्क, थर्मल गन (शरिराचे तापमान मोजण्याचे यंत्र), तसेच अन्य गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. याद्वारे लोकांना कोरोनाच्या काळात सुरक्षित रहाण्याचा संदेश देण्यात आला आहे. ही मूर्ती कोणत्या मंडळाने स्थापित केली आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

१. कोरोनाच्या या संकटात आरोग्य आणि सुरक्षा किती महत्त्वाची आहे, यासाठी जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे, असे सांगण्यात येत आहे.

२. तृणमूल काँग्रेसच्या आमदार आणि बंगाली गायिका अदिती मुनशी यांनी ही मूर्ती सर्वांना दर्शनासाठी खुली केली.