|
पेशावर (पाकिस्तान) – पाकच्या पंजाब प्रांतातील भोंग शहरात झालेल्या श्री गणपति मंदिरावरील आक्रमणाचा खैबर पख्तुनख्वा प्रांतीय विधानसभेमध्ये निषेध करण्यात आला. निषेधाचा ठराव विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला. हा ठराव विधानसभेतील अल्पसंख्यांक सदस्य रवि कुमार यांनी मांडला होता. या समवेतच खैबर पख्तुनख्वामध्ये ‘अल्पसंख्यांक व्यवहार आयोग’ स्थापन करण्याचा ठरावही संमत करण्यात आला. हा ठराव मानवी हक्क आणि संसदीय कामकाजमंत्री शौकत युसफझाई यांनी मांडला होता. याआधी पाकिस्तानच्या संसदेनेही ठराव मांडत मंदिरावरील आक्रमणाचा निषेध केला होता.