देहलीतील आमदारांचे वेतन ७२ सहस्र रुपयांवरून १ लाख ७० सहस्र रुपये झाले !

सामान्य जनतेचेही वेतन इतक्या पटींनी वाढत नाही, तितके आमदारांचे आणि खासदारांचे वेतन वाढते ! आमदारांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतांनाही नंतर आयुष्यभर निवृत्ती वेतनाचा आणि अन्य सुविधांचाही लाभ मिळत असतो, हे लक्षात घ्या ! – संपादक

देहली – देहलीतील आप सरकारने पाठवलेल्या आमदारांच्या वेतन वाढीच्या प्रस्तावाला केंद्रशासनाने संमती दिली आहे. त्यामुळे आता देहलीतील आमदारांचे एकूण वेतन ७२ सहस्र रुपयांवरून १ लाख ७० सहस्र रुपये इतके होणार आहे. याव्यतिरिक्त प्रतिवर्ष सुट्टीमध्ये बाहेर जाण्यासाठी १ लाख रुपयेही मिळणार आहेत. नवीन वाहन घेण्यासाठी १२ लाख रुपये आगाऊ देण्यात येणार आहेत.