स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनी प्रथमच माकपच्या मुख्यालयामध्ये स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवला जाणार !

  • गेली ७४ वर्षे माकपने राष्ट्रध्वज का फडकावला नाही, हे जनतेला सांगून याविषयी देशवासियांची क्षमा मागितली पाहिजे ! – संपादक
  • माकपवाल्यांना आता त्यांचा सर्वत्र पराभव होत असल्याचे लक्षात आल्यावर आणि भारतियांमध्ये अधिकाधिक राष्ट्रप्रेम जागृत होत असल्यानेच ‘स्वतः राष्ट्रप्रेमी आहोत’, हे दाखवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असेच लक्षात येते ! – संपादक
  • राष्ट्रघातकी कारवाया करणारा राजकीय पक्ष जनतेचे हित कधीतरी साधू शकेल का ? यामुळेच माकप नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक

कोलकाता (बंगाल) – स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनी प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात आणि विविध कार्यालयांमध्ये येत्या १५ ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. पक्षाकडून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. माकपचे नेते आणि आमदार सुजान चक्रवर्ती यांनी याविषयी पक्ष नेतृत्वाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. पुढील वर्षी असलेल्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पक्षाकडून वर्षभर विविध कार्यक्रमांचेही आयोजनही करण्यात येणार आहे.