‘बी.एच्.आर्.’ पतसंस्थेतील फसवणूक आणि अपहार प्रकरणात भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल संशयित आरोपी !
जळगाव येथील भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल यांच्या विरुद्ध अटक वॉरंट निघाले होते. पटेल हे अद्याप पसार आहेत.
वार्षिक अंदाजपत्रक फुगवल्याने पुणे महापालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडले !
वस्तूस्थितीला धरून अंदाजपत्रक का केले जात नाही ? अंदाजपत्रकाच्या रकमा वाढीव दाखवून स्थायी समितीला नक्की काय साधायचे आहे ?, असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
पोलीस असल्याचे सांगत नगर येथील सेवानिवृत्त शिक्षकांना लुबाडल्याप्रकरणी गुन्हा नोंद !
हे पोलिसांचे अपयश नाही का ?
पिंपरी (पुणे) येथील २ ‘सिटी स्कॅन सेंटर’ने रुग्णाकडून घेतलेली अतिरिक्त रक्कम परत मिळवून देण्यात हिंदु जनजागृती समितीप्रणीत आरोग्य साहाय्य समितीला यश !
जनतेची अशा प्रकारे होणारी लूट रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेणे अपेक्षित आहे !
सातारा जिल्हा रुग्णालयात लसीच्या कूपन वाटपावरून गदारोळ !
लसीकरण केंद्राबाहेरील कर्मचारी तोंडे पाहून कूपन वाटप करत असल्याचे आरोप केले जात आहेत.
सैन्यशाहीचा निषेध !
आपल्याच नागरिकांच्या विरोधात बंदुका चालवणारी सैन्यशाही दिवसेंदिवस क्रूर होत आहे. तिला वेळीच धडा शिकवण्यासाठी संपूर्ण विश्वाने आवाज उठवल्यास हुकूमशाहीच्या जोखडातून मुक्त होऊन म्यानमारला मोकळा श्वास घेता येईल, हेच खरे !
आतापर्यंत २०८ जणांचा जामीन संमत, तर १८ आरोपींचा जामीन फेटाळला
पालघर जिल्ह्यात झालेले साधूंचे हत्याकांड प्रकरण
लाच घेतल्याप्रकरणी तलाठ्यासह एका व्यक्तीला अटक !
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागितल्याची तक्रार नोंदवली होती. तक्रारीची पडताळणी करून पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मृत रुग्णावर दोन दिवस उपचार करून आर्थिक फसवणूक करणारे आधुनिक वैद्य योगेश रंगराव वाठारकर यांना अटक !
‘मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची’ वृत्ती असणार्या अशा आधुनिक वैद्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.