चोरांना पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण ! अशी स्थिती निर्माण होणे हे पोलिसांचे अपयश नाही का ?
पारनेर (नगर), ८ जुलै – पारनेर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पारनेर-अळकुटी रस्त्यावर असलेल्या आयटीआय महाविद्यालयासमोर ६ जुलै या दिवशी दुपारी १२ वाजता पोलीस असल्याचे सांगून अच्युतराव जगदाळे या सेवानिवृत्त शिक्षकांना लुटल्याची घटना घडली आहे. या लुटीत खिशातील १८ सहस्र रुपये, तसेच अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी रुमालात बांधून देत असल्याचे नाटक करत हातचलाखी करून, रोख रकमेसह सोन्याची अंगठी घेऊन चोर पसार झाले. याविषयी जगदाळे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.