लाच घेतल्याप्रकरणी तलाठ्यासह एका व्यक्तीला अटक !

यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

अशा लाचखोर लोकसेवकांमुळे सरकारी यंत्रणा पूर्णपणे पोखरली आहे. हे थांबवण्यासाठी लाचखोर व्यक्तींना कठोर शासन करून त्वरित निलंबनाची कारवाई करायला हवी.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

दौंड (पुणे) – दहिटणे येथील तलाठी आणि अन्य एका व्यक्तीला सातबारा उतार्‍यावरील भोगवटा वर्ग करण्यासाठी ३० सहस्र रुपयांची लाच घेतांना कह्यात घेतले. तलाठी कुंडलीक नामदेव केंद्रे (वय ३६ वर्षे) आणि दुसरी व्यक्ती शंकर दत्तू टूलै अशी लाच घेतलेल्यांची नावे असून यवत पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागितल्याची तक्रार नोंदवली होती. तक्रारीची पडताळणी करून पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.