पुणे महानगरपालिकेमध्ये ८ मासांपासून ३२ नादुरुस्त व्हेंटिलेटर धूळ खात पडून !

कोरोना महामारीमध्ये व्हेंटिलेटरच्या अभावामुळे अनेकांचा जीव जात असतांना ते नादुरुस्त स्थितीत ठेवणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

लवकरच भारतात परतणार ! – ‘सिरम’चे अदार पूनावाला यांचे आश्‍वासन

सहकुटुंब लंडन येथे गेलेले पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी लवकरच भारतात परतणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. एक दिवस आधी त्यांनी कोरोना लसीवरून भारतातील काही नेत्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचा आरोप केला होता.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

एका जिल्ह्यातील एका रुग्णालयातील कोरोनाबाधिताला रेमडेसिविर इंजेक्शन मिळवतांना आलेला कटू अनुभव !

रामजन्मभूमी मुक्त होणे, हे प्रभु श्रीरामांच्या अस्तित्वाचे प्रमाणच ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी

रामनवमीनिमित्त ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ उद्बोधक चर्चासत्र !

शनिवारवाड्याजवळ पेशवेकालीन हौद सापडला !

शनिवार पेठेजवळ (शनिवारवाडा परिसरात) महापालिकेच्या वतीने मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम चालू आहे. ३० एप्रिल या दिवशी खोदकाम चालू असतांना तेथे काही फूट खोल खणले असता पाण्याचा झरा, घडीव दगडातील पायर्‍या आणि हौद दिसला.

सोलापूरमध्ये एकाच रात्री बनशंकरी मंदिर आणि जगदंबा मंदिर येथे चोरी !

येथील शेळगी परिसरातील बनशंकरी मंदिर आणि जगदंबा मंदिर येथे पहाटे चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीसह देवीचे अलंकार चोरले. २ मेच्या पहाटे शेळगी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, याचा अपलाभ घेऊन ही चोरी झाली.

आंध्रप्रदेशामध्ये ऑक्सिजनपुरवठा बंद पडल्याने १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू

राज्यातील अनंतपूर आणि कुर्नूल येथे ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने एकूण १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. अनंतपूर येथील सरकारी रुग्णालयात ११, तर कुर्नूल येथील खासगी रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला.

पुण्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी लसीकरणाची दोनच केंद्रे !

१ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याचा निर्णय घोषित केला असला, तरी लसीच्या तुटवड्यामुळे या निर्णयाची केवळ प्रातिनिधिक पद्धतीने कार्यवाही केली जाणार आहे.

बंगालमध्ये हिंदूंसाठी काळरात्र !

भाजप घेत असलेल्या राष्ट्रहितैषी निर्णयांना जनतेचा पाठिंबा मिळतो आणि तो मतपेटीतही रूपांतरीत होतो, हे भाजपने लक्षात घेऊन असे निर्णय घेऊन त्याविषयी ठाम रहावे, हीच जनतेची अपेक्षा आहे. 

अदर पूनावाला यांनी महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासाठी महत्त्वाची भूमिका घ्यायला हवी होती ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

पुण्यामध्येच लस तयार करण्याचा कारखाना (प्लांट) असल्याने आपल्याला अधिक लस कशी मिळेल ? यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.