शनिवारवाड्याजवळ पेशवेकालीन हौद सापडला !

शनिवारवाडा

पुणे – शनिवार पेठेजवळ (शनिवारवाडा परिसरात) महापालिकेच्या वतीने मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम चालू आहे. ३० एप्रिल या दिवशी खोदकाम चालू असतांना तेथे काही फूट खोल खणले असता पाण्याचा झरा, घडीव दगडातील पायर्‍या आणि हौद दिसला. नानासाहेब पेशवे यांनी वर्ष १७४९ मध्ये कात्रज परिसरात २ तलाव बांधले होते. या तलावातील पाणी त्यांनी शहरभर फिरवले होते. हा त्या पाणी वितरण व्यवस्थेचाच एक भाग असावा, असे इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी सांगितले. इंग्रजांनीही ही वितरण व्यवस्था वर्ष १९२० पर्यंत कायम ठेवली होती. त्यातील गाळ काढून शहराला पाणीपुरवठा केला जात होता.