सोलापूरमध्ये एकाच रात्री बनशंकरी मंदिर आणि जगदंबा मंदिर येथे चोरी !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर, २ मे – येथील शेळगी परिसरातील बनशंकरी मंदिर आणि जगदंबा मंदिर येथे पहाटे चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीसह देवीचे अलंकार चोरले. २ मेच्या पहाटे शेळगी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, याचा अपलाभ घेऊन ही चोरी झाली. विशेष म्हणजे बनशंकरी मंदिर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. एकाच रात्री दोन मंदिरात चोरी झाल्याने भाविकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बनशंकरी मंदिरातील देवीच्या गळ्यातील मणी, मंगळसूत्र आणि दानपेटी चोरट्यांनी चोरली, तर जगदंबा मंदिरातील कुलूप तोडून गाभार्‍यातील दानपेटीची चोरी झाली आहे.