आयुर्वेदाने कोरोनावर केलेल्या चाचण्या, त्याला मिळालेले यश आणि षड्यंत्र

आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने आणि संशोधनाने निर्माण करण्यात आलेल्या ‘आयुष ६४’ नामक या आयुर्वेदाच्या औषधाने सौम्य अन् मध्यम लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांना लाभ होत असल्याचे संशोधनांती घोषित केले.

१०३ हून अधिक वेळा रक्तदान करणारे आणि कोरोनाच्या संकटकाळात स्वतःचा टेम्पो साहाय्यासाठी घेऊन भ्रमण करणारे मनमोहन मेहता !

मनमोहन मेहता हे ‘लायन्स क्लब इंटरनॅशल’ च्या माध्यमातून ते सेवा करत आहेत. रक्तदानाविषयी युवावर्गाचे प्रबोधन करण्यासाठी ते स्वतःही सदैव सिद्ध असतात. ‘पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क आणि अन्य वैद्यकीय साहित्य यांचे ते विनामूल्य वितरण करतात.

आधुनिक वैद्यांअभावी अकोला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बंद; चालू करण्यासाठी प्रयत्न चालू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

जिल्ह्यातील कोरोनाच्या संदर्भातील आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ‘सुपर स्पेशालिटी रुग्णालया’ला भेट देऊन पहाणी केली.

शिर्डी येथील काँग्रेसचे सचिन चौगुले आणि साईबाबा वेल्फेअर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्यावर गुन्हा नोंद !

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी येथील काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि साईबाबा वेल्फेअर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जळगाव येथे कोरोनाबाधित रुग्णांना पीपीई किटविना भेटण्यास बंदी घातल्याप्रकरणी शासकीय रुग्णालयात नातेवाइकांचा गोंधळ !

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नातेवाइकांचा वावर वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. ही गोष्ट लक्षात आल्याने ‘रुग्णांच्या नातेवाइकांना पीपीई किटविना रुग्णालयाच्या आत सोडू नये’, असा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोरोनाशी झुंज देत २३ दिवसांनंतर काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे १६ मे या दिवशी सकाळी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर १७ मे या दिवशी जिल्ह्यातील कळमनुरी येथे शासकीय इतमात अंत्यसंस्कार पार पडले.

विश्‍वव्यापी गंगा

‘गंगा पापविनाशिनी आहे, म्हणून हवी तितकी पापे करून ती एका गंगास्नानाने फेडून टाकली’, असे होत नाही, तर पाप केल्याविषयी मनात तीव्र खंत वाटणे, तसेच ‘तसे पाप पुन्हा आपल्याकडून होणार नाही’, याची दक्षता घेण्याचे गांभीर्य निर्माण होणे आवश्यक आहे. – संकलक

साधू, संत आणि महंत यांना संरक्षण पुरवा !

देहली पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गाझियाबादच्या डासना येथील मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या हत्येचा कट रचणार्‍या महंमद डार उपाख्य जहांगिर याला अटक केली आहे.

भारताचे आणखीन तुकडे होऊ न देण्यासाठी ‘धर्मांतर बंदी’ कायदा आणायला हवा ! – के. उमाशंकर, हिन्दू देवालय परिरक्षण समिती, कृष्णा जिल्हा (आंध्रप्रदेश) समन्वयक

हिंदूंच्या मंदिरांतील निधी हिंदूंसाठी, हिंदु धर्मासाठी वापरला जात नाही, तर तो सरकारी कामांसाठी वापरला जातो. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नाही. त्यामुळे धर्मांतर वाढत आहे. दळणवळण बंदीमध्ये मंदिरे बंद झाली आणि पुजार्‍यांचे अतिशय हाल झाले.