भारताचे आणखीन तुकडे होऊ न देण्यासाठी ‘धर्मांतर बंदी’ कायदा आणायला हवा ! – के. उमाशंकर, हिन्दू देवालय परिरक्षण समिती, कृष्णा जिल्हा (आंध्रप्रदेश) समन्वयक

के. उमाशंकर

हिंदूंच्या मंदिरांतील निधी हिंदूंसाठी, हिंदु धर्मासाठी वापरला जात नाही, तर तो सरकारी कामांसाठी वापरला जातो. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नाही. त्यामुळे धर्मांतर वाढत आहे. दळणवळण बंदीमध्ये मंदिरे बंद झाली आणि पुजार्‍यांचे अतिशय हाल झाले. चर्चमधील पाद्य्रांना मात्र ‘डिजिटल’ यंत्रणेद्वारे पैसे मिळत राहिले. मंदिरांतील निधी हिंदूंच्या धर्मरक्षणासाठी वापरला जायला हवा. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणामध्ये पूर्वीपासूनच अतिशय मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. पूर्व आणि पश्‍चिम गोदावरी परिसरात ५० चर्च पहायला मिळतील. भारताचे पुढे आणखीन २-३ तुकडे झालेले बघायचे नसतील, तर देशात ‘धर्मांतर बंदी’चा कायदा आणायला हवा. वाय्.एस्. राजशेखर या काँग्रेसच्या नेत्याने २.५ कोटी हिंदूंचे धर्मांतर केले. सध्याच्या स्थितीला विशेषतः आंध्रप्रदेशमध्ये जातीपातीचे राजकारण करून हिंदूंचे मोठ्या संख्येने धर्मांतर होत आहे. आरोग्य अन् आर्थिक या विषयाला धरून ही धर्मांतरे होत आहेत. हिंदु संघटनांनी हिंदु परिचारिका निर्माण करण्यासाठी महाविद्यालये निर्माण करायला हवीत.