मुंबई – कोरोनाबाधित रुग्ण आणि रक्ताची आवश्यकता असलेले रुग्ण यांना रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी कांदिवली येथील मनमोहन मेहता हे प्रती ३ मासांतून एकदा एकदा रक्तदान शिबिरांचे आयोजन करत आहेत. कोरोनाच्या विरोधात दिवसरात्र लढा देणार्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचार्यांना ते मागणीनुसार न्याहारी आणि भोजन पुरवत आहेत. प्रतिवर्षी १२५ ते १५० रक्तदान शिबिरांचे ते आयोजन करतात. विदेशात जाऊनही त्यांनी अनेकदा रक्तदान शिबीर पार पाडले आहे.
कोरोनायोद्धांना भोजन आणि अल्पाहार यांसह लागणारी अत्यावश्यक सामग्रीही हे पुरवतात. यासाठी ते स्वतःच्या ‘टेम्पो’चा उपयोग करत आहेत. जेथून संपर्क येईल, तेथे ते साहाय्यासाठी टेम्पो घेऊन जातात. मनमोहन मेहता हे ‘लायन्स क्लब इंटरनॅशल’ च्या माध्यमातून ते सेवा करत आहेत. रक्तदानाविषयी युवावर्गाचे प्रबोधन करण्यासाठी ते स्वतःही सदैव सिद्ध असतात. ‘पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क आणि अन्य वैद्यकीय साहित्य यांचे ते विनामूल्य वितरण करतात. रुग्णांनी ‘प्लाझ्मा’ द्यावा, यासाठी ते त्यांचे प्रबोधन करतात. अनेक वेळा खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांकडे ‘प्लाझ्मा’ची मागणी केली जाते. त्या वेळी होणारी धावपळ लक्षात घेऊन कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना ते ‘प्लाझ्मा’ देण्याचे आवाहन करतात. त्यामुळे ‘शासनाने ‘प्लाझ्मा’ विषयक मार्गदर्शक सूचना शासनाने प्रसारित कराव्यात’, असे त्यांचे मत आहे.