निधन वार्ता 

गावठाण केंद्रातील सनातनचे साधक श्री. हेमंत शिंदे यांचे वडील श्री. शरद धोंडिबा शिंदे (वय ६७ वर्षे) यांचे १७ मे या दिवशी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

खानमोह भागात झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलाने २ आतंकवादी ठार केले. त्यांच्याकडून २ पिस्तूल, १ हँड ग्रेनेड आणि ३ यू.बी.जी.एल्. (अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर) जप्त करण्यात आले.

शेवगाव (जिल्हा नगर) येथे ‘गुरुदत्त’ संस्थेच्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने किराणा साहित्याचे वाटप

मागील २० वर्षांपासून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सक्रीय असलेल्या ‘गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा’ संस्थेच्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने शेवगाव शहर आणि परिसरातील ६० गरजू आणि गरीब कुटुंबांना ५० सहस्र रुपये मूल्याच्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

इस्रायलकडून गाझा पट्टीवर बॉम्बवर्षाव चालूच

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी, ‘या संघर्षासाठी इस्रायलवर आक्रमण करणारे उत्तरदायी आहेत. अजूनही हे ऑपरेशन संपले नाही आणि जोपर्यंत याची आवश्यकता भासत रहाणार, तोपर्यंत ऑपरेशन चालूच रहाणार आहे’, असे  म्हटले आहे.

‘माझी आई, माझ्या बाई आणि माझे सर्वकाही’ असलेले सर्वसामान्यांतील असामान्य व्यक्तीमत्त्व प.पू. (सौ.) मंगला नरसिंह उपाध्ये !

वैशाख शुक्ल पक्ष षष्ठी (१८ मे) या दिवशी पुणे येथील संत प.पू. (सौ.) मंगला नरसिंह उपाध्येे यांची तिथीनुसार तृतीय पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

अध्यात्मातील संशोधनाचे महत्त्व !

विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही….

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ?

सौ. जान्हवी अभिजीत विभूते यांचा स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी असलेला प्रगल्भ दृष्टीकोन अन् त्यांना लाभलेली संतांची प्रीती !

वैशाख शुक्ल पक्ष षष्ठी (१८.५.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे श्री. अभिजीत आणि सौ. जान्हवी विभूते यांच्या लग्नाचा ६ वा वाढदिवस आहे.

आजीचे (प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांचे) संतसाहित्यात ‘पी.एच्.डी.’ होण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न चिकाटीने पूर्ण करणार्‍या त्यांच्या नातीने (डॉ. सौ. अपर्णा अजित बेडेकर यांनी) प्रभावीपणे व्यक्त केलेले हृद्गत !

देवी सरस्वतीच्या चरणी प्रार्थना करून आजीविषयी लहानपणापासून असलेल्या कोमल भावना व्यक्त करतांना आजीच्या चरणी अर्पण केलेली शब्दसुमने पुढे दिली आहेत.