स्थानांतर केल्यामुळेच परमबीर सिंह यांचे खोटेनाटे आरोप ! – अनिल देशमुख, माजी गृहमंत्री

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ४ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले मुंबई पोलीस आयुक्तपदावरून स्थानांतर केल्यामुळेच त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर चुका क्षमा करण्यालायक नव्हत्या. त्या अक्षम्य अशा चुका होत्या..

बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात भाजपच्या वतीने निदर्शने

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू केला असून त्यात भाजप कार्यकर्त्यांचे खून करण्यात आले आहेत. या राजकीय हिंसाचाराचा भाजपच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

भारतात तिसरी लाट येणे अटळ ! – केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन्

भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पहाता ते होणार आहे. केवळ ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसर्‍या लाटेसाठी सिद्ध रहायला हवे…..

गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाचा डाव !

अगोदर केवळ चित्रपट, नाटके यांच्या माध्यमांपुरते मर्यादित असणारे गुंड, गुन्हेगार आणि आर्थिक भ्रष्टाचार करणारे यांचे उदात्तीकरण ‘वेब सिरीज’च्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात होत आहे.

ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ !

ममता बॅनर्जी यांनी ५ मे या दिवशी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या तिसर्‍यांदा मुख्यमंत्री बनवल्या आहेत. या वेळी केवळ त्यांचाच शपथविधी पार पाडला. अन्य मंत्र्यांचा शपथविधी ६ किंवा ७ मे या दिवशी होण्याची शक्यता आहे.

ताकतोडा (जिल्हा हिंगोली) येथे पैसा नसल्याने गांजा लागवडीची अनुमती द्यावी !

जिल्ह्यात कोरोनाच्या संकटामुळे बाजारात शेतीमालास भाव मिळत नाही. अवकाळी पावसाने पिकांची हानी झाली आहे. अधिकोष बंद असल्याने पीककर्ज मिळत नाही.

रायगड जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर २०० मीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू !

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील लसीकरण केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहे.

केरळमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप भावपूर्ण वातावरणात पार पडला

हनुमानाच्या विषयीचे प्रवचन कु. रश्मि परमेश्वरन् यांनी घेतले. प्रवचनात हनुमानाविषयीची शास्त्रीय माहिती आणि एक सूक्ष्म प्रयोग घेण्यात आला.

आरोप-प्रत्यारोप करून सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर खापर फोडले !

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने महाराष्ट्र शासनाने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रहित झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात आरक्षण रहित झाल्याचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप चालू झाले असून ………

मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी ! – खासदार संभाजीराजे भोसले

न्यायालयात सर्वांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापुढे आपण बोलू शकत नाही. मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या संदर्भात मिळून चर्चा करून काही मार्ग निघतो का ? हे पहावे.