मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी ! – खासदार संभाजीराजे भोसले

भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले

कोल्हापूर – न्यायालयात सर्वांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापुढे आपण बोलू शकत नाही. मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या संदर्भात मिळून चर्चा करून काही मार्ग निघतो का ?, हे पहावे. इतर राज्यांमध्ये ५० टक्के आरक्षण दिले जाते; येथे हा कायदा रहित करण्यात आला, याची खंत वाटते. आता मराठा समाजाला ‘सुपर न्युमररी’ या न्यायाने जागा द्यावी. ‘उद्रेक’ हा शब्द सध्या काढू नका. सध्या कोरोनाचा काळ आहे. संयम बाळगा, असे आवाहन भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले.