भारतात तिसरी लाट येणे अटळ ! – केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन्

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन्

नवी देहली – भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पहाता ते होणार आहे. केवळ ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसर्‍या लाटेसाठी सिद्ध रहायला हवे, असे केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन् यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. कोरोनाचे नवे प्रकार जगभरात जसे आढळून येतील, तसेच ते भारतात देखील सापडणार आहेत, असेही ते म्हणाले.