ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ !

राज्यातील हिंसाचार बंद करण्याची राज्यपालांची सूचना

ममता बॅनर्जी तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतांना 

कोलकाता – ममता बॅनर्जी यांनी ५ मे या दिवशी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या तिसर्‍यांदा मुख्यमंत्री बनवल्या आहेत. या वेळी केवळ त्यांचाच शपथविधी पार पाडला. अन्य मंत्र्यांचा शपथविधी ६ किंवा ७ मे या दिवशी होण्याची शक्यता आहे.

१. शपथविधीच्या वेळी बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता बॅनर्जी यांना ‘राज्यातील हिंसाचार बंद झाला पाहिजे’, अशा सूचना केल्या. यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आतापर्यंत राज्यातील व्यवस्था निवडणूक आयोगाच्या हातात होती, आता मी आल्यानंतर नवीन व्यवस्था लागू करीन.

२. पत्रकारांशी बोलतांना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आमची प्राथमिकता कोविडविरोधातील लढाईला जिंकण्याची आहे. राज्यातील जनतेला हिंसा आवडत नाही. हिंसाचार घडवणार्‍या लोकांची गय केली जाणार नाही. यापुढे हिंसाचाराची घटना घडू नये.