रेमडेसिविरच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी भरून २२ सहस्र रुपयांना विक्री !
शिवाजीनगर पोलिसांनी २ आरोपींना अवैधरित्या रेमडेसिविर इंजेक्शन विकतांना पकडले होते. या आरोपींकडून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी टाकून हे बनावट इंजेक्शन २२ सहस्र रुपयांना विकले जात असे.