अमेरिकेत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना मास्क लावण्याची आवश्यकता नाही !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनी गर्दीची ठिकाणे सोडून अन्य ठिकाणी फिरतांना मास्क लावण्याची आवश्यकता नाही, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील ट्वीट करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी इस्रायलमध्येही मास्क न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.