१ मेपासून निवडक केंद्रांवर प्राथमिक स्वरूपात लसीकरण चालू करता येईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरण चालू करता येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ३० एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

हनुमान जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये विविध ‘ऑनलाईन’ उपक्रमांचे आयोजन

हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाचे तत्त्व १ सहस्र पट अधिक असते. हे लक्षात घेऊन धर्मशिक्षणवर्ग आणि सत्संग यांमध्येही संकट निवारणासाठी हनुमानाच्या पूजनाचे शास्त्र, त्याच्या जपाचे महत्त्व, साडेसाती निवारणासाठी मारुतीची पूजा कशी करावी आदींविषयी माहिती सांगण्यात आली.

आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाहीत !

नागपूरमधील ८५ वर्षीय नारायण दाभाडकर यांनी रुग्णालयातील स्वतःचा बेड दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाला दिला आणि घरी गेल्यावर ३ दिवसांनी त्यांचे निधन झाले. ही घटना सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चिली गेली.

रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा तुटवडा हे राज्यशासनाचे अपयश ! – किरीट सोमय्या, भाजप

कल्याण पश्‍चिम येथे माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी श्‍वास हॉस्पिटल आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या लाल चौकी येथील कोविड केंद्राला भेट देऊन पाहणी केली, तसेच लाल चौकी येथील स्मशानभूमीलाही भेट देऊन आढावा घेतला.

पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांत ‘रेमडेसिविर’चे रुग्णांवर दुष्परिणाम !

पालघर जिल्ह्याला पुरवठा केलेल्या रेमडेसिविरच्या ६५० कुप्यांचा वापर न करण्याचे आस्थापनाने जाहीर केले होते; पण आदेश मिळण्यापूर्वीच खासगी रुग्णालयांनी २३२ रुग्णांवर रेमडेसिविर औषधाचा वापर केला. त्यामुळे १३ रुग्णांना त्रास झाला.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या संख्येत घट; मात्र मृत्यूचे प्रमाण कायम

मुंबईमध्ये दिवसाला ९ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते; मात्र मागील ५ दिवसांची आकडेवारी पहाता मुंबईमध्ये दिवसाला कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची सरासरी संख्या ४ सहस्र ५०३ इतकी आहे.

हावडा एक्सप्रेसमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर नंदुरबार येथील हिंदुत्वनिष्ठांच्या साहाय्यामुळे घडले माणुसकीचे दर्शन !

हिंदुत्वाचे कार्य करणारे निर्दयी आणि आक्रमक असल्याचे खोटे चित्र साम्यवादी विचारवंत अन् साहित्यिक यांच्याकडून रंगवले जाते; मात्र हिंदूंवर टीका करणाऱ्यांना नंदुरबारच्या घटनेतून चपराकच मिळेल !

यवतमाळ जिल्ह्यात खासगी रुग्णालयांना ‘कोविड सुविधा पोर्टल’वर माहिती भरणे बंधनकारक !

शासकीय रुग्णालयासमवेतच खासगी कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना योग्य उपचार, बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर आदी गोष्टींची माहिती होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘covidsuvidhaytl’ या नावाने पोर्टल चालू केले आहे.

भिवंडी येथे कोरोनाचा बनावट निगेटिव्ह अहवाल सिद्ध करणार्‍या धर्मांधांच्या टोळीतील आणखी एकास अटक !

आपत्काळातही स्वार्थापोटी जनतेच्या जिवावर उठलेल्या अशा गुन्हेगारांना कडक शासन केले पाहिजे !

वाडा (जिल्हा पालघर) तालुक्यातील लाचखोर बालविकास प्रकल्प अधिकार्‍याला अटक !

वाडा तालुक्यातील डाहे गावातील अंगणवाडी केंद्रात काम करणार्‍या एका मदतनीस महिलेला कामावर कायमस्वरूपी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी गोरक्ष खोसे यांनी २१ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.