चीनची स्वीकृती !

गतवर्षी कोरोना काळात चीनने गलवान खोर्‍यात केलेल्या आगळीकीला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले होते. या वेळी भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले, तर चीनकडील ३५ ते ४० जण ठार झाले होते; मात्र चीनने आमच्या सैन्याची काहीच हानी झाली नाही, असे शेवटपर्यंत सांगितले होते. हुतात्मा भारतीय सैनिकांना भारताकडून सन्मान मिळाल्यावर चिनी जनतेनेही आमचे किती सैनिक गेले, हे विचारून, त्यांना सन्मान मिळावा, अशी मागणी केली होती. त्यालाही चीन बधला नाही आणि आता जवळजवळ १ वर्षाने त्याने ४ जण ठार झाले असा तोंडदेखला आकडा दिला. चीनने अशा किती गोष्टी लपवून खरी माहिती जगापासून लपवली असेल, याची गणतीच नाही. कोरोनाच्या संदर्भातही सत्य अजून सांगितलेले नाही. अशा चीनवर कधीच विश्‍वास ठेवून चालणार नाही, हे भारताने जाणून त्याला जरब बसेल अशी कारवाई करावी, ही अपेक्षा !