धारिष्ट्य असेल, तर भारतात नव्हे, तर पाकिस्तानमध्ये खलिस्तान बनवा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, राष्ट्रवादी विचारवंत  

दिपप्रज्वलन करतांना मान्यवर

जबलपूर (मध्यप्रदेश) – राजा रणजित सिंह यांची राजधानी देहली नव्हे, तर लाहोर होती. त्यामुळे खलिस्तानवाद्यांनी भारतात नव्हे, तर पाकिस्तानमध्ये खलिस्तान बनवले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी विचारवंत श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले. हिंदु सेवा परिषदेच्या वतीने १५ फेब्रुवारी या दिवशी श्री सरस्वतीदेवीचे पूजन आणि व्याख्यानमाला यांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कर्नल आर्.एस्.एन्. सिंह आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. श्रीराम काणे यांनीही संबोधित केले. हिंदु सेवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जैसवाणी यांनी सर्वांचे स्वागत केले, सूत्रसंचालन श्री. अर्पित तिवारी यांनी, तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष श्री. धीरज ज्ञानचंदानी यांनी केले. कार्यक्रमानंतर श्री. श्रीराम काणे यांनी श्री. कुलश्रेष्ठ यांना हिंदी पाक्षिक सनातन प्रभातचा हलाल विषयक विशेषांक भेट दिला.

नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री यांना कुणी मारले ?

श्री. कुलश्रेष्ठ पुढे म्हणाले, ‘‘कटप्पाने बाहुबलीला का मारले ?’, हा आजच्या युवापिढीच्या चर्चेचा विषय असतो. त्याऐवजी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कुणी मारले ?, लालबहादूर शास्त्री यांना कुणी मारले ?, चंद्रशेखर आझाद यांची गुप्त माहिती कुणी दिली ? याची चर्चा केली पाहिजे.’’

२६ जानेवारीच्या हिंसाचाला देश कधीही क्षमा करणार नाही ! – कर्नल आर.एस्.एन्. सिंह

२६ जानेवारीच्या दिवशी देहलीत हिंसाचार माजवून भारतमातेच्या प्रतिष्ठेवर संकट उभे करण्यात आले. ज्यांनी हे दुष्कृत्य केले, त्यांना देश कधीही क्षमा करणार नाही.

रामराज्य स्थापन करण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे ! – श्रीराम काणे, हिंदु जनजागृती समिती

जबलपुरमधील कार्यक्रमानंतर सनातन प्रभातचा हलाल विशेषांक प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांना भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे मध्य प्रदेश समन्वयक श्री. राम काणे (उजवीकडे)

हिदूंंमधील जागृती आणि बलीदान यांमुळे आज अयोध्येत भव्य श्रीराममंदिर बनत आहे. आता आम्हाला रामराज्य स्थापन करण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. १०० कोटी हिंदूंचे एक ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण होत आहे. त्यामुळे आम्हाला केवळ जन्माने नाही, तर कर्माने हिंदु बनावे लागेल. त्यासाठी सकाळी टिळा लावूनच घराबाहेर पडा, दूरभाषवर ‘हॅलो’ न म्हणता ‘जय श्रीराम’ किंवा ‘जय श्रीकृष्ण’ म्हणा, उद्घाटन फित कापून नाही, तर श्रीफळ वाढवूनच करा.