कोरोनाविषयी सूक्ष्म नियोजन करा आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा ! – राजगोपाल देवरा, पालकसचिव

कोरोनाविषयी प्रतिदिनच्या चाचण्या वाढवा, व्हेंटिलेटर्स आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा आढावा घ्या, सनियंत्रण करा. कोरोनाविषयी सूक्ष्म नियोजन करा आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (संपर्क शोध मोहिम) वाढवा, अशी सूचना पालकसचिव राजगोपाल देवरा यांनी केली.

यापुढे मुंबईमध्ये घरातील विलगीकरण बंद, संशयित व्यक्तीला ‘कोविड सेंटर’ मध्ये जावेच लागेल ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर

यापुढे कोरोनाची लक्षणे नसलेल्या नागरिकांनाही घरात विलगीकरण करण्यात येणार नाही. प्रत्येकाला ‘कोविड सेंटर’मध्ये जावेच लागेल, अशी सक्त सूचना मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी दिली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून कर्नाटक येथील जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

सनातनचा रामनाथी आश्रम हे पूज्य स्थान निर्माण करणे, हे मानवाला शक्य नाही; कारण या आश्रमाच्या कणाकणामध्ये अनुशासन आणि चैतन्य भरलेले आहे. हे त्या भगवंतालाच शक्य आहे. हे पाहून परात्पर गुरूंनी हे स्थान निर्माण केले आहे आणि तेच सांभाळत आहेत, हे लक्षात येते.

२१ फेब्रुवारीला मिरज येथे कृष्णामाई उत्सव ! – ओंकार शुक्ल, संयोजक

कृष्णा नदी ही महानदी म्हणून ओळखली जाते. कृष्णा नदीचा उत्सव महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यात केला जातो; मात्र मिरज शहरात तो होत नव्हता. गतवर्षीपासून या उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती या उत्सवाचे संयोजक श्री. ओंकार शुक्ल यांनी दिली.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी २ परिचारिकांवर गुन्हा नोंद

९ जानेवारी या दिवशी रात्री २ वाजता येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतीदक्षता नवजात केयर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.

घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांना विधानसभा अध्यक्षांसंबंधी विचारणा करण्याचा अधिकार आहे ! – सुधीर मुनगंटीवार, नेते, भाजप

राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याविषयी राज्यशासनाला प्रश्‍न विचारण्याचा अधिकार राज्यपालांना आहे, असे मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

दिशाहीन झालेली राष्ट्राची पिढी !

प्रचलित शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी मानसिक रुग्ण बनत चालला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे मन व्यापक होईल, असे शिक्षण त्यांना देणे आवश्यक आहे. आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण आहे. त्यांनी श्री भवानीमातेची उपासना करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

विवाह समारंभ, मंगल कार्यांसाठी ५० जणांचीच मर्यादा ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी

उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना आणि कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई

जत्रा, यात्रा, उरुस भरवण्यास मनाई; केवळ धार्मिक विधी करण्यास अनुमती ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

उपविभागीय दंडाधिकारी यांनी ज्या ठिकाणी धार्मिक विधी होणार आहे, त्या ठिकाणचे पर्यवेक्षण करून नियंत्रण ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.