किल्ले रायगडावर शिवजयंती आणि छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक उत्साहात साजरा !

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

पनवेल – छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीनुसार ३४७ वा राज्याभिषेक सोहळा, तर दिनांकाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ शिवजयंती एकाच दिवशी आली आहे. राज्याभिषेक सोहळ्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेनेचे महाडचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत दोन्ही सोहळे पार पडले. या सोहळ्याला मान्यवरांसह शेकडो शिवप्रेमींनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे किल्ले रायगडावरील वातावरण शिवमय झाले होते.