राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी मुसलमानांनी उपस्थित रहाण्यासाठी इमामाकडून फतवा !

  • काँग्रेससाठी अशा प्रकारचे किती फतवे काढण्यात आले, तरी आता काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे !
  • राहुल गांधी एकीकडे हिंदूंना खुश करण्यासाठी मंदिरात जाण्याची ढोंगबाजी करतात आणि दुसरीकडे त्यांच्या साहाय्यासाठी मशिदींमधून फतवे निघतात, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

मकराना (राजस्थान) – येथे १३ फेब्रुवारी या दिवशी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे किसान महापंचायतमध्ये भाषण झाले. तत्पूर्वी ‘या पंचायतमध्ये राहुल गांधी यांच्यासाठी मोठ्या संख्येने मुसलमानांनी उपस्थित रहावे’, असा फतवा येथील सुन्नी जामा मशिदीचे इमाम समसुद्दीन कादरी यांनी शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी काढला होता.

फतवा काढतांना कादरी यांनी म्हटले होते, ‘वर्ष २०२५ मध्ये मुसलमानांच्या डोक्यावर तलवार लटकलेली असणार आहे. त्यापासून रक्षण होण्यासाठी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटितपणा दाखवून द्यावा.’ ‘सभेसाठी गर्दी जमवण्यासाठी फतवा काढण्याची अनुमती इस्लामने दिली आहे’, असेही कादरी यांनी या वेळी स्पष्ट केले. हा फतवा जारी करतांनाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.