रेल्वे प्रशासनाचा संतापजनक निष्काळजीपणा !
याला उत्तरदायी असलेल्यांकडून व्याजासहित सर्व रक्कम वसूल केली पाहिजे !
नवी देहली – नवी देहली ते अंबाला रेल्वे स्थानकावरील ३ लाख रुपयांची रोख रक्कम असलेली तिजोरी घेऊन गेलेल्या पॅसेंजर रेल्वेतून ती तिजोरी उतरवलीच गेली नाही. ती थेट कालका येथे पोचली. ही तिजोरी कालका रेल्वे स्थानकावर जवळपास ४ वर्षे पडून होती. या काळात नोटाबंदीही झाली. यानंतर रेल्वे अधिकार्यांना तिजोरीची आठवण झाल्यावर तिचा शोध घेऊन ती उडण्यात आल्यावर त्यातील ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पूर्णपणे खराब झाल्याने ३ लाख रुपयांची हानी झाली. या घटनेची चौकशी करण्यासाठी अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली. २५ ऑक्टोबर २०१६ या दिवशी ही तिजोरी पाठवण्यात आली होती.