महाकुंभमेळ्यात माझी हत्या होऊ शकते ! – महंत यति नरसिंहानंदगिरी
प्रयागराज, १४ जानेवारी (वार्ता.) – जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आणि डासनादेवी मंदिराचे अध्यक्ष महंत यति नरसिंहानंदगिरी यांच्या छावणीत शिरलेल्या एका धर्मांध मुसलमानाला पोलिसांनी अटक केली. आयुब असे त्याचे नाव असून तो महंत यति नरसिंहानंदगिरी यांच्या तंबूबाहेर उभा होता. आसपासच्या साधूंना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याला विचारणा केली. तेव्हा त्याने प्रथम त्याचे नाव आयुष सांगितले; मात्र नंतर खरे नाव आयुब असे लक्षात आले.
आयुबला याविषयी विचारल्यावर तो म्हणाला की, मी येथे फिरण्यासाठी आलो होतो. मला येथे कुणी पाठवले नाही. माझे नाव आयुब अली असून एटा जिल्ह्यातील (उत्तरप्रदेश) अलीगंज येथे रहातो. येथे येण्याची अनुमती नाही, हे मला ठाऊक नव्हते. (महाकुंभमेळ्यात १० सहस्रांहून अधिक आध्यात्मिक संस्था, तसेच १२ सहस्रांहून अधिक छावण्या असतांना आणि लक्षावधी हिंदू असतांना आयुब महंत यति नरसिंहानंदगिरीजी यांच्याच छावणीपाशी कसा काय पोचला, याचा विचार हिंदू अन् उत्तरप्रदेश सरकार यांनी करणे आवश्यक आहे ! – संपादक)
मुसलमानांची संख्या वाढल्यामुळे हिंदूंना धोका ! – महंत यति नरसिंहानंदगिरी
पत्रकारांशी याविषयी बोलतांना महंत यति नरसिंहानंदगिरीजी म्हणाले की, मुसलमानांची संख्या वाढल्यामुळे हिंदूंना धोका निर्माण झाला आहे. महाकुंभमेळ्यात माझी हत्या होऊ शकते. हत्येचे कारस्थान रचण्यात आले आहे. गाझियाबाद येथील डासना मंदिराबाहेर १० सहस्रांहून अधिक मुसलमानांच्या जमावाने माझ्यावर आक्रमण केले होते. मला मारण्यासाठी सातत्याने रेकी केली जात आहे. बेंगळुरू येथील जुबेर याने मला यापूर्वीही धमकी दिली आहे. त्याने यापूर्वी मंदिरावर आक्रमण केले आहे. त्या संबंधी खटला चालू आहे. माझ्या छावणीत झालेल्या प्रकाराविषयी सर्व माहिती मी पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्ण यांना दिली आहे.