राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लक्ष्य करण्याचा आतंकवाद्यांचा प्रयत्न !

पाकला नष्ट केल्याविना भारतातील जिहादी आतंकवादी आणि त्यांचा धोका नष्ट होणार नाही, ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन सरकारने कृती करणे आवश्यक !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजन दिन’ साजरा करण्यास प्रोत्साहन द्या !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग साधना एक उत्तम मार्ग ! – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सध्या संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मन नियंत्रित करण्यासाठी आणि जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योगसाधना एक उत्तम मार्ग असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

शेतकर्‍यांची वीज तोडल्यास गाठ माझ्याशी आहे !

राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे. ज्या शेतकर्‍यांच्या जिवावर सत्ता मिळवली त्याच शेतकर्‍यांच्या जिवावर हे सरकार उठले आहे. शेतकर्‍यांच्या शेती पंपाची वीज कापून आघाडी सरकारने अयोग्य कृती केली आहे.

जिल्हा बँकांच्या निवडणुका १५ फेब्रवारीपासून

यापूर्वीचा १६ जानेवारीचा आदेश रहित करून आता सातारा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील १०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपासून घेण्यात येतील

मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्तांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात मनसे आंदोलन करणार

‘गरज सरो, वैद्य मरो’, अशी भूमिका प्रशासन घेत असल्याचा आरोप विविध ठिकाणचे प्रकल्पग्रस्त करत आहेत. प्रशासनाची अशीच भूमिका राहिली, तर भविष्यात नवीन प्रकल्प राबवणे कठीण होईल.

विकासकामांना गती देण्याची आवश्यकता ! – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अभय योजनेद्वारे महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. ही योजना इतर महापालिकांनी राबवावी. तसेच पुण्यात डिसेंबरपर्यंत आणखी ५०० बसगाड्या धावतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची पंकजा मुंडे यांची मागणी

पूजा चव्हाण या युवतीने ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पुणे येथे तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या प्रकरणाचे सविस्तर अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांच्या तिकिटांचे दर पूर्ववत् करावेत ! – परशुराम उपरकर, सरचिटणीस, मनसे

कोरोना महामारीच्या काळात कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या गाड्यांच्या तिकिटांचे दर २० टक्के अधिक दराने आकारले जात आहेत. हे दर न्यून करून ते पूर्ववत् करावेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा वाहतूक ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा

कचर्‍याचे वजन वाढावे, यासाठी खासगी जागेतील कचरा भरून कराराचा भंग केल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा नोंद