जम्मू-काश्मीर, पंजाब आणि देहली येथे भूकंपाचे धक्के

नवी देहली – उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजधानी नवी देहलीसह अनेक भागांमध्ये १२ फेब्रुवारीच्या रात्री ६.१ रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एन्.सी.एस्.ने) दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार अमृतसर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अमृतसरमध्ये रात्री १०.४३ वाजता भूकंपाचे धक्के बसले. त्याच्या काही मिनिटे आधीच ताजिकिस्तानमध्येही भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिक्टर स्केल इतकी होती. यामध्ये जीवित किंवा वित्त हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.