५९ लाख रुपये रोख, ८ तोळे सोनेही पळवले !
मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील किथोर भागातील एका गावात काळी जादू करणार्या रशीद खान याच्यावर १७ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे. गावकरी आणि कुटुंबातील सदस्य यांचे म्हणणे आहे की, रशीद खान याने काळ्या जादूचा वापर करून मुलीला आमिष दाखवले आणि ५९ लाख रुपयांची रोख रक्कम, ८ तोळे दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेला. पोलिसांनी रशीदच्या कुटुंबातील ३ सदस्यांना अटक केली आहे आणि लवकरच आरोपीला अटक केली जाईल असा दावा केला आहे.
रशीद खान गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. एका खून प्रकरणात तो कारागृहातही होता. तो विवाहित असून त्याला ६ मुले आहेत. गुर्जर समुदायाचे सामाजिक कार्यकर्ते नागेंद्र गुर्जर यांनी सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट करून रशीदबद्दल माहिती देणार्याला ५० सहस्र रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
संपादकीय भूमिका
|