बिहारमध्ये कोरोना चाचणी घोटाळ्याच्या प्रकरणी ५ अधिकारी निलंबित

अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

पाटलीपुत्र (बिहार) – राज्यात कोरोनाची तपासणी करण्यामध्ये घोटाळा झाल्यानंतर राज्य सरकारने तपासासाठी आरोग्य विभागाच्या १२ पथकांची नेमणूक केली आहे. तसेच तपासणीत घोळ करणारे आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी दिली.

राज्यातील जमुईत सिकंदरा आणि बारहाट येथे तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला. या प्रकरणी जमुईचे जिल्हा शल्य चिकित्सक विजेंद्र सत्यार्थी, सुधांशु लाल यांच्यासह ५ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. जमुईच्या बरहाट प्राथमिक केंद्रात ४८ रुग्णांपैकी २८ जणांचा भ्रमणभाष क्रमांक ०००००००००० (१० शून्य ) असा लिहिलेला आहे. जमुईतही १५० नोंदींपैकी ७३ भ्रमणभाष क्रमाकांसाठी असाच १० शून्यांचा उपयोग केला गेला आहे. तसापणी करणार्‍यांना त्यांचा भ्रमणभाष क्रमांक देणे बंधनकारक आहे.