नाशिक – मकरसंक्रांतीच्या दिवशी नाशिक येथे पतंगोत्सवात प्रतिबंधित नायलॉन मांजा दुचाकीस्वार सोनू धोत्रे (वय २३ वर्षे) याच्या गळ्यात अडकला. त्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. मांजाचा वापर करणार्याला अटक करून कठोर कारवाई करावी, त्याशिवाय मृतदेह कह्यात घेणार नाही, अशी भूमिका मृताच्या कुटंबियांनी घेतल. त्यामुळे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.
संपादकीय भूमिकाआणखी किती मृत्यू झाल्यावर नायलॉन मांजाची विक्री करणार्यांवर कठोर कारवाई होणार आहे ? |