कुंभक्षेत्रात युवा साधू-साध्वी यांचे दर्शन
कुंभनगरी प्रयागराज – महाकुंभनगरीत साधू-संत मोठ्या प्रमाणात पोचले आहे. या साधूंमध्ये काही युवा साधू आणि साध्वी आहेत. त्यांनी तरुण वयातच सांसारिक जीवनाचा त्याग करून अध्यात्माचा मार्ग आचरला आहे. हे साधू-साध्वी उच्चविद्याविभूषित असून सध्या ते दीक्षा घेऊन अध्यात्माचे अनुसरण करत आहेत. त्यांतीलच एक असणारे अभय सिंह अर्थात् ‘इंजिनीअर बाबा’ सध्या महाकुंभामध्ये पोचले अ ाहेत.
आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आणि तेथील अवकाश अभियांत्रिकीचे विद्यार्थी राहिलेले अभय सिंह यांना कुंभक्षेत्रात ‘इंजिनीअर बाबा’ या नावाने ओळखले जाते. त्यांनी त्यांच्याजवळील वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करून विविध आकृत्या आणि माहिती यांद्वारे ‘अध्यात्म आणि विज्ञान यांचा संबंध कसा आहे ?’ हे समजावतात. अभय सिंह यांनी सांगितले की, विज्ञान केवळ भौतिक गोष्टींविषयी सांगते; मात्र त्याचा सखोल अभ्यास केल्यास ते आपल्याला अध्यात्माकडे नेते.