Mahakumbh 2025 : पांटुन पूल अचानक बंद करण्यात येत असल्याने भाविकांना त्रास !

(पांटुन पूल म्हणजे तात्पुरता बांधण्यात आलेला पूल)

पांटुन पूल अचानक बंद केल्याने नागरिक आणि पोलीस यांच्यात वाद

प्रयागराज, १४ जानेवारी (वार्ता.) – सुरक्षेच्या कारणास्तव महाकुंभामध्ये पांटुन पूल अचानक बंद करण्यात येत आहेत. पूल अचानक बंद करण्यात येत असल्यामुळे त्या मार्गावरून जाणार्‍या भाविकांना अन्य मार्गांद्वारे जावे लागत आहे. अद्यापही अनेक भाविक प्रयागराज येथे येत आहेत. त्यांच्याकडे बॅग, पिशव्या आदी अधिक साहित्य असल्याने ते घेऊन भाविकांना अन्य मार्गावर जातांना ते सर्व साहित्य घेऊन जावे लागत आहेत. गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यातून साहित्य घेऊन चालणेही कठीण होत आहे. त्यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती असल्यास त्यांना मोठा त्रास होत आहे. पांटुन पूल बंद करतांना पुलाच्या दोन्ही टोकांना पोलीस पहारा देण्यात येतो आणि पांटुन पूल बंद करण्यात येत असल्याची उद्घोषणा केली जाते, तसेच पर्यायी कोणत्या पुलाचा उपयोग करावा, याची सूचना दिली जाते. असे असले तरी नागरिकांना गर्दीतून लांब चालत जावे लागत असल्यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यात वाद होत आहेत.