जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी ५ पोलिसांवर गुन्हा नोंद

अशांना तात्काळ निलंबित करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे. अशा घटनांची जलद गती न्यायालयात सुनावणी करून दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथील पोलिसांच्या कोठडीत चोरीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कृष्णकुमार यादव नावाच्या आरोपीचा मृत्यू झाल्याने पोलीस अंमलदार अजय सिंह आणि अन्य ४ पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यादवचा भाऊ अजय यादव याने हत्येची तक्रार केली होती. कृष्ण यादव याचा कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यावर येथे मोठा तणाव निर्माण झाला होता. लोकांनी येथे रस्ता बंद आंदोलनही केले होते.