Liton Das Dropped From Champions Trophy : हिंदु असल्याने बांगलादेशातील हिंदु क्रिकेटपटू लिटन दास याला संघातून वगळले !

पाकिस्तानच्या मुसलमान असणार्‍या माजी क्रिकेट खेळाडूने केली टीका

बांगलादेशातील हिंदु क्रिकेटपटू लिटन दास

ढाका (बांगलादेश) – बांगलादेश क्रिकेट बोर्डाने वर्ष २०२५ च्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धेसाठी घोषित केलेल्या १५ सदस्यीय संघात अनुभवी यष्टीरक्षक असणारा फलंदाज लिटन दास याचा समावेश न केल्यामुळे वाद वाढत आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी याला लिटनविरुद्ध ‘धार्मिक भेदभाव’ झाला, असे म्हटले आहे. बासित म्हणाले की, ‘लिटनला कोणत्या आधारावर वगळण्यात आले आहे ? त्याने अलीकडेच शतक ठोकले; पण त्याला केवळ तो मुसलमानेतर असल्याने काढून टाकण्यात आले. हा लिटनवर मोठा अन्याय आहे. लिटन दास याच्याविना बांगलादेश संघ अपूर्ण आहे.’

बासित यांच्या आरोपांमुळे बांगलादेश क्रिकेटमधील धार्मिक भेदभावाचे सूत्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लिटन दास याने या घटनेवर निराशा व्यक्त केली आणि निवडकर्त्यांच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे सांगत ‘भविष्यात अधिक चांगली कामगिरी करीन’, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील एकही हिंदु खेळाडू यावर तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !